रविवार, ६ सप्टेंबर, २०१५

पत्रकारितेतील व माध्यमातील भविष्यकाळ - तरुणांसाठी संधीचा

पत्रकारीतेतील भविष्यकाळ तरुणांना  नवीन संधी उपलब्ध  करून देणारा असेल असे उद्गार  एबीपी माझा चे बातमी विभाग प्रमुख श्री. राजीव खांडेकर यांनी मुंबई  मराठी पत्रकार संघाच्या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाचे
उद्घाटन करताना काढले.
शुक्रवार दि. ४ सप्टेंबर २०१५ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघात भरलेल्या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाचे उद्घाटन मा. श्री. राजीव खांडेकर यांच्या व्याख्यानाने झाले. या वेळी पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष श्री. देवदास मटाले यांनी सुरवातीला श्री. राजीव खांडेकर यांचा परिचय करून देताना उपस्थीतांचे स्वागत केले.
मंडळाचे माजी अध्यक्ष व विश्वस्त श्री. अजित वैद्य यांनी पत्रकारितेचा अभ्यासक्रम  संघाने २००० साली सुरु केला  व त्याला मिळणारा प्रतिसाद चांगला आहे हे सांगत असतानाच ह्या अभ्यासक्रमामुळे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असलात तरी तुमच्या दृष्टीकोनात  फरक पडतो हे  सांगितले. आजपर्यंत तुम्ही वाचक ह्या भूमिकेत होतात आता तुम्ही लेखक ह्या भूमिकेत जाऊन वृत्तपत्रांचे वाचन केले पाहिजे, वाचनाचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. एकच बातमी वेगवेगळ्या माध्यमांनी कशी दिली ह्याचा अभ्यास केला पाहिजे असे सांगितले.
संघाचे विद्यमान अध्यक्ष श्री. कुमार कदम यांनी हे पत्रकार संघाचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याचे सांगितले.
तसेच कोणतीही बातमी देताना त्या बातमीसाठी इतिहास, भूगोल तसेच आर्थिक, सामाजिक असे अनेक पैलुंचा अभ्यास करावा लागतो. असे मार्गदर्शन केले.
तर संघाचे अंतर्गत हिशोब तपासनीस श्री. विजय तरी यांनी अब्राहम लिंकनने शिक्षकांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला व लगेचच श्री. राजीव खांडेकर यांच्या मार्गदर्शनाला सुरवात झाली.
सुवातीलाच मी थोडे बोलणार आहे व लगेचच आपल्या प्रश्नांना उत्तरे देत आपणाशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच उशिरा आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
ह्या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य सांगताना ह्याच अभ्यासक्रम पूर्ण करून ए बी पी  माझा मध्ये आपल्या पत्रकारितेची सुरवात करणारी ज्ञानदा चव्हाण आज ए बी पी  माझा ची आघाडीची निवेदक असल्याचे कौतुकाने त्यांनी सांगितले. प्रत्येकात क्षमता असते, फक्त त्याला कष्ट, चिकाटी यांची जोड दिली तर तुम्ही पत्रकारितेच्या क्षेत्रात पाय रोवू शकता असे सांगितले.
पत्रकारितेची परंपरा मोठी असून श्री. बाळशास्त्री जांभेकर यांनी  सुरवात केली हे सांगत असतानाच पत्रकारितेचे टप्पे , काळानुसार झालेले बदल, माध्यमांमध्ये असलेली स्पर्धा, प्रत्येक माध्यमांचे असलेले वैशिष्ट्य आणि भविष्यकाळात येऊ घातलेली पत्रकारितेचे व माध्यमांचे बदलते स्वरूप यावर विवेचन केले.
यापुढील काळ हा सोशल मिडिया व मोबाईल मध्ये काम करणार्यांसाठी महत्वाचा आहे हे सांगताना वृत्त पत्रकारिता हा सर्व माध्यमांचा  पाया आहे तसेच पत्रकारिता कराल पण ह्यापुढे त्याचे माध्यम  वेगळे असेल
असे नमूद केले. तसेच ४जी, ५जी  म्हणजे काय, तंत्रज्ञानात पुढील काळात होणारे बदल आणि त्यामुळे निर्माण होणारी पत्रकारांपुढील आव्हाने व तरुण पिढीला मिळणाऱ्या भविष्यकाळातील संधी ह्याबद्दल सकारात्मक विचार त्यांनी सर्वांपुढे मांडला.
अत्यंत सोप्या भाषेत त्यांनी पत्रकारिता, विविध माध्यमे त्यासंबंधीचे समज, गैरसमज, तसेच येणाऱ्या काळातील पत्रकारितेत येण्यासाठी आत्मसात कराव्या लागणाऱ्या वैशिष्ट्यांचे महत्व नमूद करताना अनेक
तरुणांच्या शंकांचे समाधान प्रश्नोतराच्या कार्यक्रमाने केले.
व्याख्यानाचा समारोप करताना  उत्तम पत्रकार होण्यासाठी रोज दैनंदिनी लिहा , नवीन माहिती मिळवा, नोंदि ठेवा , कुतूहल जागे ठेवा, व्यक्त व्हायला शिका, सजगपणा दाखवा असा नेमका सल्ला  त्यांनी दिला


तरंग...एकअप्रतिम कलाकृती धावणारे मन आणि मनात उठणारे तरंग आपण थांबवू शकतो का ? हे  तरंग वेगवेगळे असतात आपण अनुभवलेल्या गोष्टींचे,  घ...