रविवार, ४ जानेवारी, २०१५

स्पंदन

संध्याकाळची वेळ मी अमर हिंद मंडळात एका कार्यक्रमाच्या चर्चेसाठी गेले होते. मंडळात बालनाट्याची तालीम चालू होती. तिथेच एका वल्लीची ओळख झाली. खुर्चीवर शांतपणे बसलेल्या त्या गृहस्थांशी माझी व आमचे कार्योपाध्यक्ष यांची ओळख झाली. दिसायला ४५-५० असावे. अत्यंत शांत व्यक्तिमत्व असेल असे पाहताक्षणी वाटल. नुकत्याच झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेत त्यांचे “प्यादी” नावाचे नाटक पहिल्या फेरीतून निवडले गेले. मुंबई येथील रवींद्र मधूनच नाही तर रत्नागिरी विभागातून सुद्धा हेच नाटक पुढील फेरीसाठी निवडले गेले आहे. एकाच लेखकाचे एक नाटक दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून अंतिम फेरीसाठी निवडले गेले याबद्दल त्याचे अभिनंदन केले. विशेष म्हणजे हि दोन्ही नाटकं त्यांनीच दिग्दर्शित केलेली असून सुद्धा वेगळ्या प्रकारचे सदरीकरण आपल्याला आढळेल असे त्यांनी सांगितले. खरोखरच कौतुक करण्याजोगी गोष्ट वाटली. अशाच गप्पा चालू असताना माझी उत्सुकता मला गप्प बसू देईना. म्हणून मी माझ्या पद्धतीने त्यांना जाणून घेण्यासाठी आपला व्यवसाय काय ? आपण काय करता असं विचारलं. त्यावर त्यांनी मी निवृत्त झालो आहे असं सांगितलं आणि सरांना व मला आश्चर्याचा धक्काच बसला. निवृत्त आणि ते सुद्धा २००१ साली. म्हणजे आता त्याचं वय ७४ वर्ष कोणलाही आपण त्या वयाचे दिसत नाही असं म्हटलं तर आनंदच होतो तसा त्यांना अर्थातच झाला. त्यांनी अभिमानाने सांगावयास सुरवात केली. माझी त्वचा बघा अजूनही तुकतुकीत आहे. कुठेही चेहऱ्यावर सुरकुत्या नाहीत, चालण ५० शीच्या माणसाला लाजवेल असं आहे वगैरे वगैरे… आजकाल करतात तसे काळे केस त्यांनी केले होते… पण ते ठीक आहे…. अगोचारपणे मी काही गोष्टी विचारल्या नाहीत पण एक गोष्ट मात्र नक्कीच आवडली जी त्यांनी आम्हाला सांगितली. कुठेही गेलो तरी मी घरच जेवण जेवतो. आज पर्यंत मी कधी वडा-पाव खाल्ला नाही. आणि मुख्य म्हणजे मी स्वत:च्या शरीराला खूप जपतो. खरच … मला बरच काही शिकवून गेल त्यांच्या उत्तरान… त्याच बरोबर स्वतः वरून असा प्रश्न पडला की वरून मी सुद्धा खूप तरुण दिसते पण……..आतल शरीर माझं काय वय सांगत ? म्हणूनच वाटत. .. दिसत तसं नसत म्हणून तर जग फसत… एक मात्र नक्की या व्यक्तीमुळे मलाही वाटू लागलं कि खरच… माझा मधुमेह रोखण्यासाठी मला पण प्रेम केल पाहिजे माझ्या शरीरावर आणि अर्थात मनावर…. कारण म्हणतात ना मन चीन्तते ते वैरी न चिंते… तेंव्हा शुभस्य शीघ्रम… आणि धन्यवाद आणि शुभेछा सुर्वे सरांना … त्यांचे अनुभव त्यांनी आमच्याशी Share केल्याबद्दल….

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तरंग...एकअप्रतिम कलाकृती धावणारे मन आणि मनात उठणारे तरंग आपण थांबवू शकतो का ? हे  तरंग वेगवेगळे असतात आपण अनुभवलेल्या गोष्टींचे,  घ...