चला तयार करूया आपला ब्लॉग ….
प्रथम जाणून घेऊया ब्लॉग म्हणजे नक्की काय ?
ब्लॉग हा शब्द वेब लॉग या शब्दावरून निर्माण झाला.
गमंत म्हणजे वेब लॉग या शब्दातील वे काढून टाकला तर ब्लॉग शब्द तयार होतो. पण हा झाला इंग्रजी
शब्द. उदा. वे - ब लॉग
पण खरतर वेब लॉग मध्ये लॉग म्हणजे नोंद आणि वेब म्हणजे शब्दशः अर्थ जाळे असले तरी संकेतस्थळ या अर्थी वापरले जाते.
म्हणजेच अगदी सोप्या शब्दात संकेतस्थळावरची नोंदवही असा अर्थ आपण ब्लॉग या शब्दाचा लावूया.
१९९४ मध्ये जस्टीन हूल याने links.web हि वेब नोंदवही सुरु केली म्हणून त्याला आद्य ब्लॉगर म्हणून ओळखले जाते. १७ डिसेंबर १९९७ मध्ये जॉन बर्गर याने वेब लॉग या नावाने जन्म दिला आणि नंतर १९९९ मध्ये पिटर मरहोल्त्झ ने त्यातील वे वगळून त्याला ब्लॉग म्हणण्यास सुरवात केली. (येथे ब्लॉग हा शब्द त्याने नाम व क्रियापद या दोन्ही अर्थाने येते.)
("to blog", meaning "to edit one's weblog or to post to one's weblog")
ब्लॉग म्हणजे एखाद्या वेबसाईट प्रमाणे आपल्याला हवी असलेली माहीती इंटरनेटवर ठेवणे.
आपल्या ब्लॉगवर काय लिहावे आणि कधी लिहावे, कसे लिहावे याला बंधने नाहीत . कुणीही कधीही आपला ब्लॉग उघडून त्यावर कितीहीवेळा लिहू शकतो. थोडक्यात आपले विचार मुक्तपणे
मांडण्यासाठी तसेच ते सर्वाना मुक्तपणे वाचण्यासाठी असेलेली हि नोंदवही.
नोंदवही म्हणण्याचे कारण ब्लॉगवर नोंदविलेली कुठलीही माहिती अथवा लेख त्यावर दिनांक आणि वेळेच्या क्रमवारीने नोंदविले जाते. म्हणजेच नविन माहिती सर्वात वर असते. तर काळानुसार जुनी होत गेलेली माहिती नंतर महिन्याच्या आणि मग वर्षाच्या नावानुसार ब्लॉगवर फोल्डरमध्ये विभागली जाते. अशाप्रकारे एखादी माहिती दिनांकानुसार लगेच शोधता येते.
आपण ब्लॉग कशाला म्हणतात ते पहिले. चला तर आता या संदर्भातील काही तांत्रिक शब्द समजून घेऊ.
ब्लॉग लिहिणाऱ्याला ब्लॉगर म्हणतात.
ब्लॉग लिहिण्याला ब्लॉगिंग
तर ब्लॉग वरच्या प्रत्येक नोंदीला ब्लॉगपोस्ट
सध्या ब्लॉगची सेवा देणाऱ्या वेबसाइटमध्ये www.blogger.com ही वेबसाइट फार प्रसिद्ध आहे.
www.blogger.com या वेबसाइटवर आपण आपला मोफत ब्लॉग बनवू शकता. या वेबसाइटवर आपले नविन ब्लॉगचे खाते बनविल्यासरशी आपण लगेचच त्यावर माहिती ठेवू शकता. म्हणजेच आपण आपल्या ब्लॉगवर ठेवलेली माहिती लगेचच जगभरामध्ये कुठूनही पाहता येऊ शकते.
आता आपल्या प्रत्येकाला ब्लॉग बनवण्याची उत्सुकता निर्माण झाली असेल… चला तर मग शिकूया
ब्लॉग कसा बनवायचा ते ….
STEPS TO START A BLOG ....
STEPS TO START A BLOG ....
- प्रथम www.bloggers.com log in ह्या url वर जा.
- Enter key दाबा. . आपण google च्या माध्यमातून ब्लॉग बनवत असल्याकारणे आपल्या प्रत्येकाचे gmail account व password असणे गरजेचे आहे.
- तो नसेल तर प्रथम आपणास नविन gmail account व password बनवावा लागेल
व आता sign up करा.
- आता आपण तयार झालो आपला ब्लॉग करायला.
- चला आता प्रथम आपले नाव व जे नाव आपणास ब्लॉग ला द्यायचे आहे ते type करा.
- आता आपण NEW BLOG ला क्लिक करा. .... झाला आपला ब्लॉग तयार.
- आपला ब्लॉग ज्या नावाने ओळखला जावा असे वाटते ते नाव आपण title मध्ये देऊया. व आपला url address सुद्धा. आपण दिलेले url जर आधीच कोणी दिलेले असेल तर मात्र आपल्याला नवीन नाव द्यावे लागेल.
- आपल्याला हवी ती template आपण निवडू शकता.
- सुरवातीला आपल्याला हवी ती template आपण निवडू शकता आणि आपल्या ब्लॉग चा प्रारंभ करू शकता.
- आता ब्लॉग तयार झाला आहे.
- आता खरी सुरवात इथेच आहे. आपल्याला जे पोस्ट करायचे आहे ते post ह्या नावापुढील चौकानात आपल्या पोस्ट चे नाव लिहा. (आपल्या लेखाचे नाव). आपण येथे टाकलेले पोस्ट बदलू शकतो.
- You can create new blog posts, edit posts, and edit pages from under the “Posting” tab.
-
आता compose ला जाऊन entered करा. म्हणजे आपण मुख्य पानावर जाऊन आपल्या ला जो लेख, माहिती, कविता, चुटके इ. प्रसिद्ध करायचे असेल ते आपण type करू या. तसेच text editor मध्ये जाऊन आपण फोन्ट साईझ, colour, ई. बदल करून आपले पोस्ट सजवू शकता.
- The body of your post will get entered into the “Compose” text editor, where you will also be able to access basic text editor functions such as font size, text color, the ability to insert links
- “Edit HTML” वापरून आपण आपली पोस्ट HTML फोर्मेट मध्ये घालू शकतो. तसेच “Post Settings ” सेक्शन च्या खाली असलेल्या options मध्ये असलेल्या ठिकाणी आपल्याला हवा तो option निवडू शकतो. You can also use the “Edit HTML” tab to insert your post in HTML format, if you prefer.The “Post Options” section located underneath the “Compose” text editor will allow you to enable reader comments, HTML settings, and post the time and date.
-
- आता आपण आपलं पोस्ट save करू शकतो, preview (बघू) शकतो किंवा direct publish (प्रसिद्ध) करू शकतो.
- You can now either select “Save Now” to save your post, “Preview” to preview your post before publishing to your blog, or “Publish Post” to publish your post directly to your newly created blog.
- वरील लेखांसाठी पुढील संदर्भ वापरण्यात आले.
- १. http://www.wikihow.com/index.php?title=Start-a-Blog-on-Blogger&action=submit2&override=yes
- २. http://www.sahajach.com/mala_bharpoor_yete/creat_blog02.html
- आपल्याला ब्लॉग कसा तयार करायचा हे शिकायचे असेल तर पुढील video वर click करा.
फारच उपयुक्त माहिती
उत्तर द्याहटवाफारच उपयुक्त माहिती
उत्तर द्याहटवा