----सीमा
-------------------------------------------------------------------------------------------------------------
कलाकार - नसरुद्दिन शहा, रत्ना पाठक शहा, नीरज कबी, अमृता सुभाष, विक्रम गोखले, ज्योती सुभाष, उत्तरा बावकर ,संदेश कुलकर्णी
कालावधी - फक्त ५५ मि.
प्राज फौंडेशन च्या सहकार्याने , ZTCC पुणे यांनी प्रदर्शित केलेला
म्हणजे जिंदगी भरच नाही तर जिंदगी के द बाभी ... इतरांनी लक्षात ठेवावा असा हा फक्त ५५ मिनटांचा हा
चित्रपट......
या माहितीपटाची मूळ लेखन , कथा व चित्रपट संवाद सुमित्रा भावे या दिग्गज लेखिकेचे आहेत. तसेच दिग्दर्शन व त्याचे संकलन सुमित्रा भावे आणि सुनील सुखटनकर यांचे आहे.
कलाकार, चित्रपट कथा, आणि एकूणच तांत्रिक दृष्ट्या हा माहितीपट पहिल्यापासून मनाची पकड घेणारा आहे.
रत्ना पाठक शहा व नसरुद्दिन शहा, विक्रम गोखले, अमृता सुभाष ज्योती सुभाष यांसारख्या दिग्गज कलाकारांचा अभिनय पाहण्यासाठी हा चित्रपट पाहायलाच हवा.
उत्कृष्ट कथा, चित्रपट संवाद, संकलन, सामाजिक आशय असलेला व तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असा हा चित्रपट
बघण्यासाठी वेळ जरूर काढा.
अवयव दानाबद्दल असलेले समज , गैरसमज दूर करण्यात आणि समाजप्रबोधन करण्यात हा चित्रपट
शत प्रतिशत यशस्वी झाला आहे खरा पण हा चित्रपट बघून अवयव दान करायला समाजातील अनेक
जण पुढे येतील तेंव्हाच खऱ्या अर्थाने या चित्रपटाचे यश असेल...
शेवटी जाता जाता आपले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विंदा करंदीकर यांची कविता हा चित्रपट पाहताना मला आठवली.
देणाऱ्याने घेत जावे , घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे....
अत्यंत सुंदर चित्रपट... अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवा. ...
(खाली दिलेल्या PHIR ZINDAGI ) या शब्दावर mouse चे बटन नेऊन click करा की लिंक येईल त्यावर click करा, लगेच चित्रपट चालू होईल. )
PHIR ZINDAGI
