बाद.... outdated.... - by Seema
एका वेब जर्नालिझम च्या क्लास मध्ये एक व्याख्याता, भविष्यातील मिडिया चे महत्व, वेब पत्रकारितेला आलेले चांगले दिवस आणि भविष्यकाळातील ह्या माध्यमांसाठी निर्माण होणारी स्पर्धा यावर माहिती देत होते. त्यांनी सांगितले कि यापुढे ह्या क्षेत्रात यायचे असेल तर उत्कृष्ट बोलू, लिहू शकणारे व
जे तंत्रज्ञानात निष्णात असतील, म्हणजेच जे अष्टपैलु असतील त्यांना खूप संधी असतील. आजकाल परदेशात मेडिया चे शिक्षण घेऊन येऊन माध्यमांमध्ये इतर भाषिक बरेच तरुण नोकरी करत आहेत. त्यामुळे आता मराठी मुलांना अनेक स्पर्धक या क्षेत्रात आहेत. आणि तुम्ही जर वयाने ४०-५० मध्ये असाल व तुमचा स्वतःचा ब्रांड नसेल तर तुम्ही बाद ... झालात.
असं सातत्याने लागोपाठ दोन लेकचर मध्ये ऐकावे लागले आणि नकळत मनात आपण प्रौढ दिसायला लागलो
याची जाणीव झाली आणि एक मानसिक धक्का बसला. ...
खरतर धक्का बसण्याचे काही कारण नव्हते... पण काल पर्यंत सर्वजण तू किती तरुण दिसतेस असं काहीसं म्हणणारे आज एकदम मला बाद .. करतात. बऱ्याच जणांच्या बाबतीत नेहमी उलट असंत, वयापेक्षा मोठी दिसणारी माणस आपल्या आजूबाजूला खूप आढळतात. ...
पण आता आपलं वय दिसू लागलं हे कुठेतरी मनात सुखावलं... कारण चला निदान आपल्या वयाचा मान ठेवून तरी आता आपल्याकडून काही गोष्टींची अपेक्षा केली जाणार नाही, आपल्याला गृहीत धरलं जाणार नाही ... असं वाटलं.
पण वस्तुतः हे मान्य करावाच लागेल कि तंत्रज्ञानात वेगाने होणाऱ्या बदलामुळे आम्हीच काय, आजची
तरुण पिढी सुद्धा जर त्या वेगाने धावली नाही तर लवकरच बाद होईल....
गेल्या काही वर्षात झपाट्याने होणाऱ्या बदलांना सर्वानाच सामोरे जावे लागणार आहे, स्वीकारावे लागणार
आहे. ... हे खरेच
आपण बाद झालो हे काही मनाला पटेना, आणि विचार करता करता लक्षात आलं खरतर प्रत्येक गोष्ट हि
काही काळाने बाद होत असतेच कि..
आता हेच पहा ना, पूर्वी चाळी होत्या त्या बाद झाल्या आणि सोसायट्या उभ्या राहिल्या, आता गगनचुंबी
इमारती उभ्या राहत आहेत. ...
पूर्वी ची शिक्षण पद्धती जाऊन आता विद्यार्थी संगणकावर ऑन लाईन शिकत आहेत. .. पूर्वी तासन तास चालणाऱ्या बुद्धिबळाच्या स्पर्धांची जागा जलद स्पर्धांनी घेतली आहे.
मौल्यवान समजणाऱ्या जुन्या दागिन्यांची जागा सुद्धा नवीन दागिन्यांनी घेतली आहे. ...
आम्हाला बाद ठरवणारी आजची तरुण पिढी पाय घट्ट रोवून किती काळ उभी राहील ? आपली मूल्य किती
टिकवून ठेवेल ? का आजच वेळ आहे त्यांना समजावण्याची कि तंत्रज्ञानाच्या पाठी धावताना ... जुन्या पिढीकडे जरा मागे वळून बघा , शाश्वत जीवनशैली ते कसे जगत होते ते अभ्यासा नाहीतर...
तुमच्या नंतरची पिढी तुम्ही तिशीत जाईपर्यंत तुम्हाला outdated... बाद ठरवेल.... कारण काही झाल तरी
प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात... आणि प्रत्येक गोष्ट कधीतरी outdated... बाद होतचं ... असते.
घरातल्या कागदाचं digitalization करायचं ठरवलं आणि समोर प्रशस्तीपत्र आलं ते वडलांना मिळालेल्या
राज्य पुरस्काराच... अभिमान वाटला आणि त्या अनुषंगाने मनात विचार आला....की
जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती हि बाद .. होतच असते... पण तिने जर तिच्या आयुष्यात काही कार्य केले असेल आणि त्या संबंधीची काही माहिती, कागदपत्रे असतील तर ह्याच तंत्रज्ञानामुळे आपण ती जतन करू शकतो .. कारण ती पुढल्या पिढीसाठी देन असते... त्यांच्यासाठी ते प्रेरित ठरू शकत...
तेंव्हा तरुणानो लक्षात ठेवा .... . जु नं ते सो नं हे पण खर ....
Marathi lipi phone var nahi.Mhanun ha prayatna.
उत्तर द्याहटवाBad kahich hot nahi.Rupantarit hota. Patrakarita tich aahe.Madhyam badala.
उत्तर द्याहटवाखूप सुंदर टिप्पणी दिलीत... मला आवडली... मी तुमच्याशी सहमत आहे...
उत्तर द्याहटवाNavin Madhya machi olakh Karun gheun te aplese Zale Ki badal sahaj hoto.
उत्तर द्याहटवाJune sone asle tari tyala navyachi zalali anavich lagte.
Ase mala vat te.Article changle aahe.
छान प्रयत्न. लिहीत रहा भरपूर वाव आहे. बाद काही होत नाही तर ते बदलत असते, बदल स्वीकारला की झाले. शुभेच्छा
उत्तर द्याहटवामराठी लिपी फोनवर आहे शोध घ्या.
छान प्रयत्न. लिहीत रहा भरपूर वाव आहे. बाद काही होत नाही तर ते बदलत असते, बदल स्वीकारला की झाले. शुभेच्छा
उत्तर द्याहटवामराठी लिपी फोनवर आहे शोध घ्या.
आपल्याला कोणी बाद म्हटले तर धक्का बसणे साहजिकच आहे पण त्यामुळे निराशा येण्याची काहीच गरज नाही. बदल हा सृष्टीचा नियम आहे. काळानुरूप जो बदलेल तोच काळाच्या ओघात टिकेल.
उत्तर द्याहटवाआपल्याला कोणी बाद म्हटले तर धक्का बसणे साहजिकच आहे पण त्यामुळे निराशा येण्याची काहीच गरज नाही. बदल हा सृष्टीचा नियम आहे. काळानुरूप जो बदलेल तोच काळाच्या ओघात टिकेल.
उत्तर द्याहटवाआपल्याला कोणी बाद म्हटले तर धक्का बसणे साहजिकच आहे पण त्यामुळे निराशा येण्याची काहीच गरज नाही. बदल हा सृष्टीचा नियम आहे. काळानुरूप जो बदलेल तोच काळाच्या ओघात टिकेल.
उत्तर द्याहटवासुंदर
उत्तर द्याहटवाआपल्याला कोणी बाद म्हटले तर धक्का बसणे साहजिकच आहे. पण त्यामुळे निराश होण्याचे काहीच कारण नाही. एकतर या जगात काहीच शाश्वत नाही. दुसरं म्हणजे परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे जो काळानुरूप बदलेल तोच काळाच्या ओघात टिकेल. तेव्हा काळाची पावलं ओळखून स्वतःला बदलले तर मला नाही वाटतं आपल्यावर बाद होण्याची वेळ येईल
उत्तर द्याहटवाआपल्याला कोणी बाद म्हटले तर धक्का बसणे साहजिकच आहे. पण त्यामुळे निराश होण्याचे काहीच कारण नाही. एकतर या जगात काहीच शाश्वत नाही. दुसरं म्हणजे परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे जो काळानुरूप बदलेल तोच काळाच्या ओघात टिकेल. तेव्हा काळाची पावलं ओळखून स्वतःला बदलले तर मला नाही वाटतं आपल्यावर बाद होण्याची वेळ येईल
उत्तर द्याहटवासुंदर
उत्तर द्याहटवासुखदा, मला हा प्रवास खूपच आवडला आहे. व्याख्यात्यांना आम्ही बाद म्हणजे वयामुळे बाद झालो असं म्हणायचं होत, वस्तुतः आपण काळानुसार बदल स्वीकारत असतो पण तरुणपणी असणारा वेग हळू हळू कमी होत जातो, मी खरतर वयानुसार होणारे बदल enjoy करत आहे... आयुष्यातील हे बदल एकदाच अनुभवायला मिळतात, परत मागे फिरता येणार नाही, त्यामुळे ते हवे हवेसे वाटतात... शेवटी ... i am enjoying aging eligantly. आणि म्हणूनच काळाची पावलं ओळखून मी technosavy होत आहे... आणि मला वाटत ... कि
हटवामला मी निराश वगैरे झाले नाही पण जे करायचं होत ते करायची संधी वयामुळे गेली असं वाटलं ... म्हणून
आजकालच्या तरुण मुलाचं मला कौतुक वाटतं की त्यांना जे आवडतं तेच ते शिकतात, आणि व्यवसाय म्हणून स्वीकारतात... आणि आता खूप वेगवेगळ्या क्षेत्रात संधी .. पण त्यांना मिळत आहे याचा आनंद होत आहे.