मंगळवार, १९ जानेवारी, २०१६

बुरख्या आडच्या स्त्रिया



Image result for बुरखा आडच्या स्त्रिया IMAGES

रविवारची संध्याकाळची गोष्ट. ... रस्त्यावरून चालत जात असताना माझ्या समोरच एका पुरुषाने, एका बाईला उचलले व दाणकन स्कूटरवर बसवले...व बडबड सुरू केली. बिचारी “ती” बुरखाधारी महिला लाजेने शरमिंदी झाली... कारण त्याचवेळी मी चालत तिच्याजवळ जाऊन पोचले होते. जोरजोरात खेकसत तो पुरुष ओरडत होता...
गुपचूप सरळ बस स्कूटरवर... त्यावर तिचे बोलणे ... रस्त्यात तमाशा नको...

क्षणात वाटले मध्ये पडावे  पण हिमतच झाली नाही. पण बोच मात्र कायम राहिली...

मनात प्रश्न निर्माण झाले .. बुरख्याआडच्या स्त्रियांचं जग आहे तरी कस ? खरच या स्त्रिया अजूनही मोकळ्या झाल्या आहेत का ? 21 व्या शतकात सुद्धा स्वतंत्र विचारसरणीच्या आहेत का ? आणि असतील तरी प्रत्यक्षात तसे वागू शकतात का ? का विचाराने मुक्त असल्या तरी अभिव्यक्ती – प्रगटीकरणाचे धैर्य अजूनही त्यांचाच नाही तर आम्हा स्त्रियांच्यात आहे का ?

एव्हढे विचार मनात यायला असाच काहीसा प्रसंग आदल्या रात्री ऐकायला मिळाला. ... आणि एकंदरीतच स्त्रियांच्या सद्य स्थितीबद्दल, त्यांच्या प्रश्नांबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

त्याच असं झालं, माझ्या मैत्रिणीच्या ऑफिसची सहल ज्याला हल्ली offsite म्हणतात एका रिसॉर्ट वर गेली होती. हल्ली ग्लोबल वर्ल्ड मध्ये offices मध्ये मिश्र संस्कृतीचे, धर्माचे अनेक जण एकत्र काम करताना दिसतात. त्या ग्रुप मध्ये सुद्धा पुरुषांबरोबर महिलाही होत्या. मॅनेजमेंटचे वेगवेगळे खेळ, स्पर्धा याला अगदी उधाण आल होत. अर्थात 4 ग्रुप्स आणि त्यांच्यात स्पर्धा... स्पर्धा आली म्हणजे हार- जीत आलीच... मग जिंकल्याचा जल्लोष...आणि एकंदरीतच उत्साही वातावरण... सर्वजण आनंद लुटत होते... पहिला खेळ झाला आणि कोणीतरी  प्रसिद्ध शांताबाईच...
गाणं लावलं...त्या गाण्यावर बेधुंद होऊन सर्व नाचू लागले. जणू काही वातावरणात रोजच्या जीवनातील असणारा ताण, तणाव, चिंता सगळ्याला मूठमाती दिली होती... काहीजण फोटो काढत होते. आजकाल सहज उपलब्ध असलेल्या मोबाइल मध्ये ध्वानीचित्रीकरण करू लागले. अर्थात हे सर्व होत असताना महिला व पुरुषांनी  वेगवेगळे नाचण्याचे भान ठेवले होते... आणि महिलांमध्ये तरुण अर्थात जास्त होते. ..

खेळ, स्पर्धा झाली... आणि मध्यंतरला एकमेकांना विडियो दाखवणे सुरू होते. तेवढ्यात “ती” भानावर आली.
आणि मैत्रिणीला म्हणाली “ए हा व्हिडीओ देऊ नकोस हं कोणाला – कारण मी नाचले आहे ना त्यात.”

 ह्यात काय अस गैर होत ? असा प्रश्न माझ्या मैत्रिणीला पडला व तिला खरतर धक्काच बसला.  .. खरच ... जे आपल्या दृष्टीने महत्वाचे प्रश्न वाटत नाहीत ते इतर समाजाच्या दृष्टीने  इतके महत्वाचे असतात ? पण  हा प्रश्न तिच्यासाठी फार महत्वाचा होता कारण “ती” बुरखाधारी होती. उच्चशिक्षित असलेली व व्यवस्थापक असलेली आपली सखी “ती” अजूनही बंधनात आहे. बुरख्याआड आहे. समाजाच्या दडपणाखाली वावरत आहे..

पण हे फक्त “ती” च्या पुरत मर्यादित आहे का ? तर याच खर उत्तर “नाही” असच आहे. कारण आपण बुरख्याआड नसलो तरी याच
समाजाच्या दडपण असल्या मुळे म्हणा किंवा परंपरांमुळे, संस्कारांमुळे  म्हणा आपण बुरखा पांघरून बसलेल्या महिला आहोत...

फरक  एवढाच कि आपण पहाट पहिली आहे, पण अजूनहि  आपण मुक्तपणे वावरत आहोत का ?इथेही प्रश्नचिन्हच आहे...

आणि याच उत्तर नाही हेच आहे. 

अजूनही अनेक गोष्टींचे निर्णय आपण स्वतंत्रपणे घेत नाही. समाजमनाच्या दबावामुळे म्हणा किंवा आपल्यावर लहानपणापासून झालेल्या संस्कारामुळे असेल आपण व्यक्त व्हायला घाबरतो, मोकळ्या व्हायला घाबरतो, आणि याच भीतीपोटी काहीजणी व्यक्त होतच नाहीत आणि त्याचीच सवय होत आपले व्यक्तिमत्व घडत जाते.  पण हे व्यक्त होणे, म्हणजेच दबाव, ताण-तणाव ह्यातून मोकळे होण्याची गरज आजही आहे.. हे जेंव्हा सहजतेने घडेल ... तेंव्हाच व त्याला पुरुषवर्गाची सुद्धा साथ असले तेंव्हाच खऱ्या अर्थाने ... स्त्री मोकळी होईल 

खरतरं बुरख्याआडच्या स्त्रियांचा निदान बुरखा दिसतो तरी पण बुरखा पांघरून वावरणाऱ्या स्त्रियांचे दुख कसे कळणार ?

- सीमा कोल्हटकर 



३ टिप्पण्या:

  1. सीमा...स्त्रियाना गृहित धरणार्या, जाणून बुजुन दुर्लक्षित ठेवणार्या मनोवृत्तीला तु नेमके टिपले आहेस.हे वाचताना 'नाॅट विदाउट माय डाॅटर ' मधले प्रसंग आठवत होते.खुप संवेदनाशिल लिहिते आहेस..हे लिहिणं आवश्यक आहेच..लिहिती रहा...कोणतीही विषय सीमा न बाळगता...

    उत्तर द्याहटवा
  2. सीमा...स्त्रियाना गृहित धरणार्या, जाणून बुजुन दुर्लक्षित ठेवणार्या मनोवृत्तीला तु नेमके टिपले आहेस.हे वाचताना 'नाॅट विदाउट माय डाॅटर ' मधले प्रसंग आठवत होते.खुप संवेदनाशिल लिहिते आहेस..हे लिहिणं आवश्यक आहेच..लिहिती रहा...कोणतीही विषय सीमा न बाळगता...

    उत्तर द्याहटवा
  3. सीमा खूपच छान आणि बऱ्याच जणांच्या मनात रेंगाळणार्या विषयाला हात घातलास. तू लिहिलं आहेस ते अगदी खरं आहे. आपण महाराष्ट्रात जन्माला आलेल्या स्त्रिया त्यामानाने बऱ्याच नशिबवान आहोत. आगरकर, कर्वे, फूले दांपत्य यांच्यासारखे सुधारक आणि त्या सुधारणा थोड्याफार कुरबूरीनंतर का होईना स्विकारणारा समाज आपल्याला मिळाला. त्यामुळेच तू म्हटल्याप्रमाणे आपण पहाट तरी बघतो आहोत. पण महाराष्ट्राबाहेर विशेषतः उत्तर भारतात अजूनही परिस्थिती भीषणच आहे. आपल्याबरोबर काम करणाऱ्या तिकडच्या सहकार्याशीं बोलताना वारंवार हे जाणवत रहातं. स्वतःच्या भाग्याचा हेवा करावा असं वाटतं.
    असो.... पहाट झालीच आहे तर दिवस उगवेल हे नक्की. आणि तो लवकरच उगवेल अशी आशा करूया
    तोपर्यंत ✍✍⛅⛅⛅

    उत्तर द्याहटवा

तरंग...एकअप्रतिम कलाकृती धावणारे मन आणि मनात उठणारे तरंग आपण थांबवू शकतो का ? हे  तरंग वेगवेगळे असतात आपण अनुभवलेल्या गोष्टींचे,  घ...