10:07 PM, 5/3/2019] kolhatkarseema: ती आली , तीने विचार मांडले, आणि रसिकांना जिंकले…
अमर हिंद मंडळाची व्याख्यानमाला दरवर्षी येते आणि लग्नसोहळा असावा अशा पद्धतीने ७ दिवस कसे संपतात ते समजतच नाही. या वर्षीची ७२ वी व्याख्यानमाला विशेष लक्षात राहील. वयाच्या ५ व्या वर्षांपासून मी व्याख्यानमाला ऐकत मोठी झाले. मला आठवत आहे तेंव्हा १० पैसे, २५ पैसे, एक रुपया अशी तिकिटे असायची. बैठकी साठी वेगळे तिकिट, खुर्च्यांसाठी वेगळे .. आणि तिकीट काढायला रांग लागत असे. त्या वेळचा काळ वेगळा होता. अनेकविध
चॅनेल्स नव्हती. किंबहुना १९७२ नंतर आपल्या देशात दूरदर्शन आले. त्यामुळे वैचारिक आणि मनोरंजनाची साधने
फारशी नसल्यामुळे असेल कदाचित, त्या वेळी व्याख्यानांना गर्दी होत असे. आजकाल अनेकविध चॅनेल्स, असंख्य मनोरंजनाची साधने त्यामुळे व्याख्यानांना येणारी गर्दी आता कमी होऊ लागली आहे. तरी गर्दी पेक्षा दर्दी माणसे व्याख्यानाला येतात ही एक समाधानाची बाब म्हणावी लागेल.
गेली ७२ वर्षे व्याख्यान विविध स्वरूपाची होत असली तरी ह्यावर्षी कार्यकारी समितीने काळाच्या बदलाप्रमाणे थोडे बदल करायचे ठरवले. आणि त्यातलाच एक बदल म्हणजे ह्यावर्षी प्रथमच तरुण व्याख्यात्याला बोलवायचे ठरले.
व्याख्यानाला येणारे वक्ते हे प्रौढ असावेत म्हणजे ते प्रगल्भ असतात ह्या विचाराला जरासा छेद देत प्रथमच तरुण
वक्त्याला प्राधान्य दिले. सात दिवसांपैकी एक व्याख्यान हे तरुणाईचे होते.
आणि खरोखरच आजची तरुण पिढी अभ्यासू आहे, प्रगल्भ आहे आणि आत्मविश्वासू आहे हे त्या व्याख्यानाने
लक्षात आले. डॉ. सुखद चिमोटे ह्या मानसशास्त्रज्ञ असलेल्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टर.
ती आली, तिने विचार मांडले, आणि रसिकांना जिंकले - विचार करायला प्रवृत्त केले.
कारण अर्थातच विषय होता मनाचा.. विचारांचा आणि भावनांचा.
अर्थात सर्वांचा जिव्हाळ्याचा…
आपले अध्यात्मिक वाग्ङ्मय , विनोबा भावे ह्यांची गीताई, रामदास स्वामींचे दासबोध ह्यातील असलेले मनाचे वर्णन, मनाची स्थिती ह्यासंबंधीचे विचार
मानसशास्त्रात दुसऱ्या पद्धतीने कसे वर्णिले आहे हे अतिशय सुदंर, सोप्या भाषेत सांगताना
तिने रसिकांची मने जिंकली.
ह्या व्याख्यानाने आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये नक्की वागायचं कसं ? हे शिकायला मिळालं.
दोन पिढ्यांमधील अंतर आता १० - २० वर्षाचे राहिले नाही, त्यामुळे पिढ्यापिढ्यांमधील मतभेद टाळायचे असतील,
स्वतःचे त्रास कमी करायचे असतील..
आणि आनंदी राहायचे असेल तर “ स्वीकारायला शिका” हा मंत्र त्यांनी दिला.
काही गोष्टी ह्या आपल्या नियंत्रणात नसतात तेंव्हा स्वीकारायला शिका तसेच मार्ग काढण्यासाठी आपल्या
मनाला प्रश्न विचारायला शिकले पाहिजे कारण मन म्हणजे आपले विचार .. आपण जसा विचार करतो तशा आपल्या भावना येतात आणि आपले वर्तन त्याप्रमाणे होते हे उदाहरणांनी समजावून दिले.
फक्त सकारात्मक विचारपद्धती नाही तर मन स्थिर करायला शिकले पाहिजे.. असे केलं तर आनंदाची अनुभूती अनुभवाल हे सांगितलं..
सर्व सगळे हेच सांगतात की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार…
फक्त प्रत्येकाची पद्धत वेगळी… तेंव्हा मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण…
खरी मजा पुढे झाली… दोन दिवसांनी माझ्या लक्षात आले… की ज्या व्याख्यानमालेचे मी आतुरतेने वाट पाहत असते त्या व्याख्यानमालेच्या आयोजनापासून ते ती संपेपर्यंतचा माझा काळ हा अतिशय आनंददायी असतो ,
हीच माझी वर्षभराची ऊर्जा असते..... आणि म्हणून काही गोष्टी मनासारख्या घडत नसल्या तरी त्या स्वीकारून
वसंत व्याख्यानमालेच्या व्याख्यानांमध्ये रमण्याचा आनंद हा अवर्णीय असतो माझ्यासाठी… हाच विचार मला माझ्या प्रत्येक गोष्टीत करायचा आहे कारण मला आनंदी राहायचे आहे… आणि आता त्याचा मंत्र ह्यावेळच्या व्याख्यानमालेतून मला मिळाला आहे…

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा