मंगळवार, ८ डिसेंबर, २०१५

फिर जिंदगी ----जिंदगी भर लक्षात ठेवावा असा चित्रपट ... --- सीमा


फिर जिंदगी.... जिंदगी भर ...लक्षात ठेवावा  असा चित्रपट...
----सीमा
-------------------------------------------------------------------------------------------------------------
कलाकार - नसरुद्दिन शहा, रत्ना पाठक शहा, नीरज कबी, अमृता सुभाष, विक्रम गोखले, ज्योती सुभाष, उत्तरा                 बावकर ,संदेश कुलकर्णी
कालावधी - फक्त ५५  मि.

प्राज फौंडेशन च्या सहकार्याने , ZTCC पुणे  यांनी प्रदर्शित केलेला
म्हणजे जिंदगी भरच नाही तर जिंदगी के द बाभी ... इतरांनी लक्षात ठेवावा असा हा फक्त ५५ मिनटांचा हा
चित्रपट......

या माहितीपटाची मूळ लेखन , कथा व चित्रपट संवाद सुमित्रा भावे या दिग्गज लेखिकेचे आहेत. तसेच दिग्दर्शन व त्याचे संकलन  सुमित्रा भावे आणि सुनील सुखटनकर यांचे आहे.
कलाकार, चित्रपट कथा, आणि एकूणच तांत्रिक दृष्ट्या हा माहितीपट पहिल्यापासून मनाची पकड घेणारा आहे.
     रत्ना पाठक शहा  व नसरुद्दिन शहा, विक्रम गोखले, अमृता सुभाष  ज्योती सुभाष  यांसारख्या दिग्गज कलाकारांचा अभिनय पाहण्यासाठी हा चित्रपट पाहायलाच हवा.
उत्कृष्ट कथा, चित्रपट संवाद, संकलन, सामाजिक आशय असलेला व  तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असा हा चित्रपट
बघण्यासाठी वेळ जरूर काढा.
अवयव दानाबद्दल असलेले समज , गैरसमज दूर करण्यात आणि समाजप्रबोधन करण्यात हा चित्रपट
शत प्रतिशत यशस्वी झाला आहे खरा  पण हा चित्रपट बघून अवयव दान करायला  समाजातील अनेक
जण पुढे येतील तेंव्हाच खऱ्या अर्थाने या चित्रपटाचे  यश असेल...
शेवटी जाता जाता  आपले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते  विंदा करंदीकर यांची कविता हा चित्रपट  पाहताना मला आठवली.
देणाऱ्याने घेत जावे , घेणाऱ्याने  घेत जावे
घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे....

अत्यंत सुंदर चित्रपट... अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवा. ...
(खाली दिलेल्या PHIR ZINDAGI ) या शब्दावर mouse चे बटन नेऊन click करा की लिंक येईल त्यावर click करा, लगेच चित्रपट चालू होईल. )

PHIR ZINDAGI






रविवार, ६ डिसेंबर, २०१५

बाद.... (Outdated)....

बाद.... outdated.... - by Seema


एका वेब जर्नालिझम च्या क्लास मध्ये एक व्याख्याता, भविष्यातील मिडिया चे महत्व, वेब पत्रकारितेला आलेले चांगले दिवस आणि भविष्यकाळातील ह्या माध्यमांसाठी निर्माण होणारी स्पर्धा यावर माहिती देत होते.  त्यांनी सांगितले कि यापुढे ह्या क्षेत्रात यायचे असेल तर  उत्कृष्ट बोलू, लिहू शकणारे व
जे तंत्रज्ञानात निष्णात असतील, म्हणजेच जे अष्टपैलु असतील त्यांना खूप संधी असतील. आजकाल परदेशात मेडिया चे शिक्षण घेऊन येऊन माध्यमांमध्ये इतर भाषिक बरेच तरुण नोकरी करत आहेत. त्यामुळे आता  मराठी मुलांना अनेक स्पर्धक या क्षेत्रात  आहेत. आणि तुम्ही जर वयाने ४०-५० मध्ये असाल व तुमचा स्वतःचा ब्रांड नसेल तर तुम्ही बाद ... झालात.
असं सातत्याने लागोपाठ दोन लेकचर मध्ये ऐकावे लागले आणि नकळत मनात आपण प्रौढ दिसायला लागलो
याची जाणीव झाली आणि एक मानसिक धक्का बसला. ...
खरतर धक्का बसण्याचे काही कारण नव्हते... पण काल पर्यंत सर्वजण तू  किती तरुण दिसतेस असं काहीसं म्हणणारे  आज एकदम मला बाद .. करतात. बऱ्याच जणांच्या बाबतीत नेहमी उलट असंत, वयापेक्षा मोठी दिसणारी माणस आपल्या आजूबाजूला खूप आढळतात. ...
पण आता आपलं वय दिसू लागलं हे कुठेतरी मनात सुखावलं... कारण चला  निदान आपल्या वयाचा मान ठेवून तरी आता आपल्याकडून काही गोष्टींची अपेक्षा केली जाणार नाही, आपल्याला गृहीत धरलं जाणार नाही ... असं वाटलं.
पण वस्तुतः हे मान्य करावाच लागेल कि तंत्रज्ञानात  वेगाने होणाऱ्या बदलामुळे आम्हीच काय, आजची
तरुण पिढी सुद्धा जर त्या वेगाने धावली नाही तर लवकरच बाद होईल....
गेल्या काही वर्षात  झपाट्याने होणाऱ्या बदलांना सर्वानाच सामोरे जावे लागणार आहे, स्वीकारावे लागणार
आहे. ...  हे खरेच
आपण बाद झालो हे काही मनाला पटेना, आणि विचार करता करता लक्षात आलं  खरतर प्रत्येक गोष्ट हि
काही काळाने बाद होत असतेच कि..
आता हेच पहा ना, पूर्वी चाळी होत्या त्या बाद झाल्या आणि सोसायट्या उभ्या राहिल्या, आता गगनचुंबी
इमारती उभ्या राहत आहेत. ...
पूर्वी ची शिक्षण पद्धती जाऊन आता विद्यार्थी संगणकावर ऑन लाईन शिकत आहेत. .. पूर्वी तासन तास चालणाऱ्या बुद्धिबळाच्या स्पर्धांची जागा जलद स्पर्धांनी घेतली आहे.
मौल्यवान समजणाऱ्या जुन्या दागिन्यांची जागा सुद्धा नवीन दागिन्यांनी घेतली आहे. ...
 आम्हाला बाद ठरवणारी आजची तरुण पिढी पाय घट्ट रोवून किती काळ उभी राहील ? आपली मूल्य किती
टिकवून ठेवेल ? का आजच वेळ आहे त्यांना समजावण्याची कि तंत्रज्ञानाच्या पाठी धावताना ... जुन्या पिढीकडे जरा मागे वळून बघा , शाश्वत जीवनशैली ते कसे जगत होते ते अभ्यासा  नाहीतर...
तुमच्या नंतरची पिढी तुम्ही तिशीत जाईपर्यंत तुम्हाला outdated... बाद ठरवेल.... कारण काही झाल तरी
प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात... आणि प्रत्येक गोष्ट कधीतरी outdated... बाद होतचं ... असते.
घरातल्या कागदाचं digitalization करायचं ठरवलं आणि समोर प्रशस्तीपत्र आलं ते वडलांना मिळालेल्या
राज्य पुरस्काराच... अभिमान वाटला आणि त्या अनुषंगाने मनात विचार आला....की
जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती हि बाद .. होतच असते... पण तिने जर तिच्या आयुष्यात काही कार्य केले असेल आणि त्या संबंधीची काही माहिती, कागदपत्रे  असतील तर ह्याच तंत्रज्ञानामुळे आपण ती जतन करू शकतो .. कारण ती पुढल्या पिढीसाठी देन असते... त्यांच्यासाठी ते प्रेरित ठरू शकत...

तेंव्हा तरुणानो लक्षात ठेवा .... . जु नं ते सो नं  हे पण खर ....



गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०१५

कोनाडा...

कोनाडा ...

परवाचीच गोष्ट. सुट्टी असल्याकारणाने मार्केट मधून चालत घराकडे येत होते. घराच्या वाटेवर महानगरपालिकेने खूप मोठे काम काढले आहे. जवळ जवळ सहा महिने चालणार आहे म्हणे. त्यामुळे अर्थातच 
त्याच्या आजूबाजूला " नो एन्ट्री " चे बोर्ड झळकताना दिसत होते. जे काम चालले आहे ते वरळीसमुद्रा कडे 
जाणारया रस्त्यावर असल्याने अर्थातच बोर्डाच्या पलीकडील मोठाच्या मोठा रस्ता गाड्यांसाठी बंद झाला आहे. 
सहज लक्ष गेल... तर तिकडे बाईक वरून येऊन तरुण मुले सेल्फी काढण्यात गुंग झाली होती. जणू काही त्या 
मुलांना एक कोनाडा सापडला... दृश्य मोठ लक्षणीय होत. ... 
मागे मोठे मोकळे आकाश... 
दूरपर्यंत पसरलेला रिकामा रस्ता... 
आणि 
त्या पार्श्वभूमीवर तरुण तरुणाईचा  घोळका.
बाईक वर बसून....एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवत, वेगवेगळ्या पोझेस देत चाललेले फोटो सेशन ... आणि अर्थातच  सेल्फी...
खरतरं फोटो काढायचा होता  त्या तरुणाईचा पण मोबाईल नव्हता... 
रस्त्याच्या दुसरया बाजूला अनेक मोटर बाईक्स उभ्या केलेल्या ... काही बायका विशेषतः घर काम करणाऱ्या गप्पा मारत उभ्या.. चेहऱ्यावरचे भाव म्हणजे आता आम्हाला इथून कोणी हलवणार नाही असे... 
दृश्य बघितलं आणि मला लहानपणची आठवण झाली... 
घर कितीही मोठ असो वा  लहान असो.. बालपणी असेच आपण कोनाडे शोधत होतो.... 
मग ते भातुकली खेळण्यासाठी असोत वा आई मार देईल म्हणून लपण्यासाठी असो.. 
मला तर लहान असताना एका स्टुलात जाऊन वाचत बसायला आवडायचं..
अगदी भातुकलीचा खेळ खेळण्यासाठी आम्ही चाळीत सर्वजण एका कोनाड्यात जाऊन खेळायचो.. कि जेणे करूण कोणी आम्हाला हलवणार नाही.. 
पूर्वी प्रत्येक घराघरात कोनाडे असायचे. काही वेळेला त्या कोनाड्यात देव असायचे, पुस्तक असायची तर आणखी काही.. 
वय वाढलं तरी अजूनही असे कोनाडे शोधून वाचत बसायला मला आवडत... पण अर्थात ते कोनाडे मोठे असावे 
लागतात... नाहीतर बाहेर पडायची पंचाईत व्हायची. 
का कुणास ठाऊक   ... प्रत्येकाच्या मनात असा एक कोनाडा असतोच नाही का ? 
जिथे आपल्याला स्वस्थता असावी असं वाटतं.. हा कोनाडा हि आपल्या हक्काची जागा वाटते. ... 
पण ह्या कोनाड्याचे अनेकजण सकारात्मक आणि नकारात्मक वापर करताना आपण ऐकतो... पण म्हणून 
कोनाड्याचे महत्व काही कमी होत नाही. 
आता आमच्या त्या मोठ्या कोनाड्यात थोड्याच दिवसात क्रिकेट सुरु होईल, पत्त्याचे डाव रंगतील, प्रेमिकांचे अड्डे तयार होतील ... पण अर्थात वेळा वेगवेगळ्या असतील... 
 वरळी बांद्रा सी लिंक वरून येणाऱ्या वाहनांची रहदारी आता काही काळासाठी तरी बंद राहील ... आणि 
तरुणाईला  सापडलेल्या ह्या नवीन कोनाड्यात भविष्यातील स्वप्ने रंगवली जातील... 







रविवार, २२ नोव्हेंबर, २०१५

ब्लॉग ची सफर ..

चला तयार   करूया  आपला ब्लॉग ….

प्रथम जाणून घेऊया ब्लॉग म्हणजे नक्की काय ?
ब्लॉग हा शब्द  वेब  लॉग या शब्दावरून निर्माण झाला.
गमंत म्हणजे वेब लॉग या शब्दातील वे काढून टाकला तर ब्लॉग शब्द तयार होतो. पण हा झाला इंग्रजी
शब्द. उदा. वे  - लॉग
पण खरतर वेब लॉग मध्ये लॉग म्हणजे नोंद  आणि वेब म्हणजे शब्दशः अर्थ जाळे  असले तरी संकेतस्थळ या अर्थी वापरले जाते.

म्हणजेच अगदी सोप्या शब्दात संकेतस्थळावरची नोंदवही असा अर्थ आपण ब्लॉग या शब्दाचा लावूया.

१९९४ मध्ये जस्टीन हूल याने links.web हि वेब नोंदवही सुरु केली म्हणून त्याला आद्य ब्लॉगर म्हणून ओळखले जाते.   १७ डिसेंबर १९९७ मध्ये जॉन  बर्गर याने वेब लॉग या नावाने जन्म दिला आणि नंतर १९९९ मध्ये पिटर मरहोल्त्झ ने त्यातील वे वगळून  त्याला ब्लॉग म्हणण्यास सुरवात केली. (येथे  ब्लॉग हा शब्द त्याने नाम क्रियापद या दोन्ही अर्थाने येते.)
("to blog", meaning "to edit one's weblog or to post to one's weblog")

ब्लॉग म्हणजे एखाद्या वेबसाईट प्रमाणे आपल्याला हवी असलेली माहीती इंटरनेटवर ठेवणे.

आपल्या ब्लॉगवर काय लिहावे आणि कधी लिहावे, कसे  लिहावे याला बंधने नाहीत . कुणीही कधीही आपला ब्लॉग उघडून त्यावर कितीहीवेळा लिहू शकतो. थोडक्यात  आपले विचार मुक्तपणे
मांडण्यासाठी तसेच ते सर्वाना मुक्तपणे वाचण्यासाठी असेलेली हि नोंदवही.
नोंदवही म्हणण्याचे कारण  ब्लॉगवर नोंदविलेली कुठलीही माहिती अथवा लेख त्यावर दिनांक आणि वेळेच्या क्रमवारीने नोंदविले जाते. म्हणजेच नविन माहिती सर्वात वर असते. तर काळानुसार जुनी होत गेलेली माहिती नंतर महिन्याच्या आणि मग वर्षाच्या नावानुसार ब्लॉगवर फोल्डरमध्ये विभागली जाते. अशाप्रकारे एखादी माहिती दिनांकानुसार लगेच शोधता येते.  
आपण ब्लॉग कशाला म्हणतात ते पहिलेचला तर आता या संदर्भातील काही तांत्रिक शब्द समजून घेऊ.

ब्लॉग लिहिणाऱ्याला  ब्लॉगर म्हणतात.
ब्लॉग लिहिण्याला ब्लॉगिंग
तर ब्लॉग वरच्या प्रत्येक नोंदीला ब्लॉगपोस्ट

सध्या ब्लॉगची सेवा देणाऱ्या वेबसाइटमध्ये www.blogger.com  ही वेबसाइट फार प्रसिद्ध आहे.
www.blogger.com  या वेबसाइटवर आपण आपला मोफत ब्लॉग बनवू शकता. या वेबसाइटवर आपले नविन ब्लॉगचे खाते बनविल्यासरशी आपण लगेचच त्यावर माहिती ठेवू शकता. म्हणजेच आपण आपल्या ब्लॉगवर ठेवलेली माहिती लगेचच जगभरामध्ये कुठूनही पाहता येऊ शकते.  
आता आपल्या प्रत्येकाला ब्लॉग बनवण्याची उत्सुकता निर्माण झाली असेलचला तर मग शिकूया
ब्लॉग कसा बनवायचा ते ….

STEPS TO START A BLOG ....


  • प्रथम www.bloggers.com log in  ह्या url वर  जा.
  •  
  • Enter key दाबा. . आपण  google च्या माध्यमातून ब्लॉग बनवत असल्याकारणे आपल्या प्रत्येकाचे gmail account  व password असणे गरजेचे आहे. 


  1. Start a Blog on Blogger Step 2.jpg
  • तो नसेल तर प्रथम आपणास नविन gmail account व password नवावा लागेल
       व आता sign up  करा. 

  1. Start a Blog on Blogger Step 3.jpg
  2. आता आपण तयार झालो आपला ब्लॉग करायला. 
  3. चला आता प्रथम आपले नाव व जे नाव आपणास ब्लॉग ला द्यायचे आहे ते type करा. Start a Blog on Blogger Step 4.jpg
  4. आता आपण  NEW BLOG ला क्लिक करा. .... झाला आपला ब्लॉग तयार. 
    Start a Blog on Blogger Step 5.jpg
  5. आपला ब्लॉग ज्या नावाने ओळखला जावा असे वाटते ते नाव आपण title मध्ये देऊया. व आपला url address सुद्धा.  आपण दिलेले url जर आधीच कोणी दिलेले असेल तर मात्र आपल्याला नवीन नाव द्यावे लागेल. Start a Blog on Blogger Step 6.jpg
  6. आपल्याला हवी ती template आपण निवडू शकता. Start a Blog on Blogger Step 7.jpg
  7. सुरवातीला आपल्याला हवी ती template आपण निवडू शकता आणि आपल्या ब्लॉग चा प्रारंभ करू शकता. Start a Blog on Blogger Step 8.jpg
  1. आता ब्लॉग तयार झाला आहे. Start a Blog on Blogger Step 9.jpg
  2. आता खरी सुरवात इथेच आहे. आपल्याला जे पोस्ट करायचे आहे ते post ह्या नावापुढील चौकानात आपल्या पोस्ट चे नाव लिहा. (आपल्या लेखाचे नाव). आपण येथे टाकलेले पोस्ट बदलू शकतो. 
  3. You can create new blog posts, edit posts, and edit pages from under the “Posting” tab.
  4. Start a Blog on Blogger Step 10.jpg
    आता compose ला जाऊन entered करा. म्हणजे आपण मुख्य  पानावर जाऊन आपल्या ला जो लेख, माहिती, कविता, चुटके इ. प्रसिद्ध करायचे असेल ते आपण type करू या. तसेच text editor मध्ये जाऊन आपण फोन्ट साईझ, colour, ई. बदल करून आपले पोस्ट सजवू शकता. 
  5. The body of your post will get entered into the “Compose” text editor, where you will also be able to access basic text editor functions such as font size, text color, the ability to insert links
  1. Start a Blog on Blogger Step 12.jpg
  2. “Edit HTML”  वापरून आपण आपली पोस्ट HTML फोर्मेट मध्ये घालू शकतो. तसेच
  3. “Post Settings ” सेक्शन च्या खाली असलेल्या options मध्ये असलेल्या ठिकाणी आपल्याला हवा तो option निवडू शकतो.  You can also use the “Edit HTML” tab to insert your post in HTML format, if you prefer.The “Post Options” section located underneath the “Compose” text editor will allow you to enable reader comments, HTML settings, and post the time and date.
  4. Start a Blog on Blogger Step 13.jpg

  5. आता आपण  आपलं  पोस्ट  save  करू शकतो, preview (बघू) शकतो किंवा direct publish (प्रसिद्ध) करू शकतो. 
  6. You can now either select “Save Now” to save your post, “Preview” to preview your post before publishing to your blog, or “Publish Post” to publish your post directly to your newly created blog.
  7. Start a Blog on Blogger Step 14.jpg
    वरील लेखांसाठी पुढील संदर्भ वापरण्यात आले.
  8. १. http://www.wikihow.com/index.php?title=Start-a-Blog-on-Blogger&action=submit2&override=yes 
  9. २. http://www.sahajach.com/mala_bharpoor_yete/creat_blog02.html
  10. आपल्याला ब्लॉग कसा तयार करायचा हे शिकायचे असेल तर पुढील  video वर click करा. 

रविवार, ६ सप्टेंबर, २०१५

पत्रकारितेतील व माध्यमातील भविष्यकाळ - तरुणांसाठी संधीचा

पत्रकारीतेतील भविष्यकाळ तरुणांना  नवीन संधी उपलब्ध  करून देणारा असेल असे उद्गार  एबीपी माझा चे बातमी विभाग प्रमुख श्री. राजीव खांडेकर यांनी मुंबई  मराठी पत्रकार संघाच्या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाचे
उद्घाटन करताना काढले.
शुक्रवार दि. ४ सप्टेंबर २०१५ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघात भरलेल्या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाचे उद्घाटन मा. श्री. राजीव खांडेकर यांच्या व्याख्यानाने झाले. या वेळी पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष श्री. देवदास मटाले यांनी सुरवातीला श्री. राजीव खांडेकर यांचा परिचय करून देताना उपस्थीतांचे स्वागत केले.
मंडळाचे माजी अध्यक्ष व विश्वस्त श्री. अजित वैद्य यांनी पत्रकारितेचा अभ्यासक्रम  संघाने २००० साली सुरु केला  व त्याला मिळणारा प्रतिसाद चांगला आहे हे सांगत असतानाच ह्या अभ्यासक्रमामुळे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असलात तरी तुमच्या दृष्टीकोनात  फरक पडतो हे  सांगितले. आजपर्यंत तुम्ही वाचक ह्या भूमिकेत होतात आता तुम्ही लेखक ह्या भूमिकेत जाऊन वृत्तपत्रांचे वाचन केले पाहिजे, वाचनाचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. एकच बातमी वेगवेगळ्या माध्यमांनी कशी दिली ह्याचा अभ्यास केला पाहिजे असे सांगितले.
संघाचे विद्यमान अध्यक्ष श्री. कुमार कदम यांनी हे पत्रकार संघाचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याचे सांगितले.
तसेच कोणतीही बातमी देताना त्या बातमीसाठी इतिहास, भूगोल तसेच आर्थिक, सामाजिक असे अनेक पैलुंचा अभ्यास करावा लागतो. असे मार्गदर्शन केले.
तर संघाचे अंतर्गत हिशोब तपासनीस श्री. विजय तरी यांनी अब्राहम लिंकनने शिक्षकांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला व लगेचच श्री. राजीव खांडेकर यांच्या मार्गदर्शनाला सुरवात झाली.
सुवातीलाच मी थोडे बोलणार आहे व लगेचच आपल्या प्रश्नांना उत्तरे देत आपणाशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच उशिरा आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
ह्या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य सांगताना ह्याच अभ्यासक्रम पूर्ण करून ए बी पी  माझा मध्ये आपल्या पत्रकारितेची सुरवात करणारी ज्ञानदा चव्हाण आज ए बी पी  माझा ची आघाडीची निवेदक असल्याचे कौतुकाने त्यांनी सांगितले. प्रत्येकात क्षमता असते, फक्त त्याला कष्ट, चिकाटी यांची जोड दिली तर तुम्ही पत्रकारितेच्या क्षेत्रात पाय रोवू शकता असे सांगितले.
पत्रकारितेची परंपरा मोठी असून श्री. बाळशास्त्री जांभेकर यांनी  सुरवात केली हे सांगत असतानाच पत्रकारितेचे टप्पे , काळानुसार झालेले बदल, माध्यमांमध्ये असलेली स्पर्धा, प्रत्येक माध्यमांचे असलेले वैशिष्ट्य आणि भविष्यकाळात येऊ घातलेली पत्रकारितेचे व माध्यमांचे बदलते स्वरूप यावर विवेचन केले.
यापुढील काळ हा सोशल मिडिया व मोबाईल मध्ये काम करणार्यांसाठी महत्वाचा आहे हे सांगताना वृत्त पत्रकारिता हा सर्व माध्यमांचा  पाया आहे तसेच पत्रकारिता कराल पण ह्यापुढे त्याचे माध्यम  वेगळे असेल
असे नमूद केले. तसेच ४जी, ५जी  म्हणजे काय, तंत्रज्ञानात पुढील काळात होणारे बदल आणि त्यामुळे निर्माण होणारी पत्रकारांपुढील आव्हाने व तरुण पिढीला मिळणाऱ्या भविष्यकाळातील संधी ह्याबद्दल सकारात्मक विचार त्यांनी सर्वांपुढे मांडला.
अत्यंत सोप्या भाषेत त्यांनी पत्रकारिता, विविध माध्यमे त्यासंबंधीचे समज, गैरसमज, तसेच येणाऱ्या काळातील पत्रकारितेत येण्यासाठी आत्मसात कराव्या लागणाऱ्या वैशिष्ट्यांचे महत्व नमूद करताना अनेक
तरुणांच्या शंकांचे समाधान प्रश्नोतराच्या कार्यक्रमाने केले.
व्याख्यानाचा समारोप करताना  उत्तम पत्रकार होण्यासाठी रोज दैनंदिनी लिहा , नवीन माहिती मिळवा, नोंदि ठेवा , कुतूहल जागे ठेवा, व्यक्त व्हायला शिका, सजगपणा दाखवा असा नेमका सल्ला  त्यांनी दिला


रविवार, १५ फेब्रुवारी, २०१५

आत्मविश्वास
कालचा आणि आजचा दिवस खूपच छान गेला. ऑफिस सुटल्यावर गोरेगाव ला ताई कडे ब्रुनो ग्रोनिंग चे माहितीपर सत्र समजून घेतलं. नंतर पु. ल. देशपांडे सभागृह पार्ल्याला लोकसत्ता तर्फे आयोजित केलेल्या महाराष्ट्राचा वक्ता/वक्ती कोण ह्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोचलेल्या ९ स्पर्धकांचे वक्तृत्व ऐकायला गेले. तर आज म्हणजे रविवारी संध्याकाळी आठवड्याच्या संध्याकाळची समाप्ती स्वरांगी मराठे च्या सुश्राव्य गायनाच्या मैफिलीने झाली. तीनही कार्यक्रमाना मजा तर आली पण मला जाणवलं ते म्हणजे जर तन मन धन लावून अभ्यासपूर्ण, वैचारिक बैठक असेल व स्वतः वरचा आत्मविश्वास असेल तर कोणतेही काम आपण उत्तम करू शकतो. विचारांची सुस्पष्टता आपल्याला ठामपणा कडे नेते नव्हे आत्मविश्वास निर्माण करते. ब्रुनो ग्रोनेनिंग माहितीपर सत्रात असे लक्षात आले कि शेवटी मनाची शांतता असेल तर आत्मविश्वास आपोआप निर्माण होतो. तसेच जी गोष्ट आपण करणार त्यावर विश्वास हवा. थोडक्यात काय मुलभूत शांत राहणे, विचारांचा गोंधळ होऊ न देणे हे जर मुळात साधता आले तर काहीही अशक्य नाही. आपला स्वतःवरच विश्वास नसेल तर तुम्ही उत्कृष्ट सादरीकरण करू शकत नाही. परिणामी समोरची व्यक्ती असो कि आपली परीक्षा असो आपण ते निभावू शकत नाही. तेंव्हा आधी विश्वास ठेवा स्वतः वर आणि निश्चिंत रहा. मग विजय तुमचाच आहे. कालचे सर्व स्पर्धक तरुण होते हि अत्यंत आनंदाची गोष्ट होती आणी जवळ जवळ५०० ते १००० च्या जनसमुदायासमोर अत्यंत निर्भीडपणे सर्वांनी आपले विचार मांडले. खूप मजा आली ऐकताना. जेथे एकमेकांशी संवाद कमी झाला आहे तेथे समुदायासमोर बोलण्यासाठी लागणारा आत्मविश्वास ह्य मुलांमध्ये होता हि अचानक घडलेली घटना नाही तर त्यांच्या बालपणापासून हळू हळू घडत गेलेली ती एक प्रक्रिया आहे. निशा देसाईच्या वाक्तृत्वाबद्दल सांगायचे झाले तर एका शांत लयीत घाई घाई न करता पण समोरच्या ला समजावून देत ठामपणे विचार मांडत पण मुद्देसूद असे तिचे भाषण ऐकताना मजा आली. तेच स्वरांगी च्या गाण्याबद्दल म्हणता येईल. लहानपणापासून तिच्यावर झालेले गाण्याचे संस्कार, शांत, संयमी आणि हसरा चेहरा आणि गातानाचा असणारा आत्मविश्वास ह्या सगळ्याचा परिपाक म्हणजे तिचे झालेले उत्कृष्ट गाणे. भरीस भर म्हणजे आज भारताने पाकिस्तानवर केलेली मात. विराट कोहली चे शतक हे सुद्धा मला त्याच्या शांत,संयमी वृत्तीमुळे साध्य झालेले यश आहे असे म्हणावे लागेल. करोडो च्या जनसमुदायासमोर एकाग्र चित्ताने, आत्मविश्वासाने, प्रचंड दबाव असताना शांतपणे खेळणे हि सर्वात कठीण गोष्ट कोहलीने लीलया पेलली आणि भारताला विजयश्री मिळवून दिली. त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आज वयाच्या ५० शी कडे जाताना ह्या शांतपणाचे फायदे आता कळू लागले आहेत. आणि त्याच्यामुळे कुठेतरी मनातली भीती जाऊन स्वतःबद्दलचा आत्मविश्वास वाढू लागला आहे. त्यामुळे निर्णयक्षमता देखील वाढीस लागली आहे असे जाणवते. जी गोष्ट कळायला माझ्यासारख्या चंचल व्यक्तीला दीर्घ कालावधी लागला तो कालावधी माझ्या या ब्लॉग वरच्या लिखाणाने तरुणांना लवकर कळावा आणि शांततेतून निर्भिडपणाकडे आत्मविश्वासपूर्वक वाटचाल व्हावी म्हणून हा लेखप्रपंच.

रविवार, ४ जानेवारी, २०१५

स्पंदन

संध्याकाळची वेळ मी अमर हिंद मंडळात एका कार्यक्रमाच्या चर्चेसाठी गेले होते. मंडळात बालनाट्याची तालीम चालू होती. तिथेच एका वल्लीची ओळख झाली. खुर्चीवर शांतपणे बसलेल्या त्या गृहस्थांशी माझी व आमचे कार्योपाध्यक्ष यांची ओळख झाली. दिसायला ४५-५० असावे. अत्यंत शांत व्यक्तिमत्व असेल असे पाहताक्षणी वाटल. नुकत्याच झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेत त्यांचे “प्यादी” नावाचे नाटक पहिल्या फेरीतून निवडले गेले. मुंबई येथील रवींद्र मधूनच नाही तर रत्नागिरी विभागातून सुद्धा हेच नाटक पुढील फेरीसाठी निवडले गेले आहे. एकाच लेखकाचे एक नाटक दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून अंतिम फेरीसाठी निवडले गेले याबद्दल त्याचे अभिनंदन केले. विशेष म्हणजे हि दोन्ही नाटकं त्यांनीच दिग्दर्शित केलेली असून सुद्धा वेगळ्या प्रकारचे सदरीकरण आपल्याला आढळेल असे त्यांनी सांगितले. खरोखरच कौतुक करण्याजोगी गोष्ट वाटली. अशाच गप्पा चालू असताना माझी उत्सुकता मला गप्प बसू देईना. म्हणून मी माझ्या पद्धतीने त्यांना जाणून घेण्यासाठी आपला व्यवसाय काय ? आपण काय करता असं विचारलं. त्यावर त्यांनी मी निवृत्त झालो आहे असं सांगितलं आणि सरांना व मला आश्चर्याचा धक्काच बसला. निवृत्त आणि ते सुद्धा २००१ साली. म्हणजे आता त्याचं वय ७४ वर्ष कोणलाही आपण त्या वयाचे दिसत नाही असं म्हटलं तर आनंदच होतो तसा त्यांना अर्थातच झाला. त्यांनी अभिमानाने सांगावयास सुरवात केली. माझी त्वचा बघा अजूनही तुकतुकीत आहे. कुठेही चेहऱ्यावर सुरकुत्या नाहीत, चालण ५० शीच्या माणसाला लाजवेल असं आहे वगैरे वगैरे… आजकाल करतात तसे काळे केस त्यांनी केले होते… पण ते ठीक आहे…. अगोचारपणे मी काही गोष्टी विचारल्या नाहीत पण एक गोष्ट मात्र नक्कीच आवडली जी त्यांनी आम्हाला सांगितली. कुठेही गेलो तरी मी घरच जेवण जेवतो. आज पर्यंत मी कधी वडा-पाव खाल्ला नाही. आणि मुख्य म्हणजे मी स्वत:च्या शरीराला खूप जपतो. खरच … मला बरच काही शिकवून गेल त्यांच्या उत्तरान… त्याच बरोबर स्वतः वरून असा प्रश्न पडला की वरून मी सुद्धा खूप तरुण दिसते पण……..आतल शरीर माझं काय वय सांगत ? म्हणूनच वाटत. .. दिसत तसं नसत म्हणून तर जग फसत… एक मात्र नक्की या व्यक्तीमुळे मलाही वाटू लागलं कि खरच… माझा मधुमेह रोखण्यासाठी मला पण प्रेम केल पाहिजे माझ्या शरीरावर आणि अर्थात मनावर…. कारण म्हणतात ना मन चीन्तते ते वैरी न चिंते… तेंव्हा शुभस्य शीघ्रम… आणि धन्यवाद आणि शुभेछा सुर्वे सरांना … त्यांचे अनुभव त्यांनी आमच्याशी Share केल्याबद्दल….

तरंग...एकअप्रतिम कलाकृती धावणारे मन आणि मनात उठणारे तरंग आपण थांबवू शकतो का ? हे  तरंग वेगवेगळे असतात आपण अनुभवलेल्या गोष्टींचे,  घ...